भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथैया यांचे निधन

भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या वेशभुषाकार भानू अथैया यांचं वयाच्या ९१ व्या वर्षीय निधन झाले. गेल्या तीन वर्षांपासून त्या ब्रेन ट्युमरने ग्रासल्या होत्या. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

१९८२ साली प्रदर्शित झालेला गांधी या चित्रपटात भानू अथैया यांनी कॉस्ट्युम डियाजनिंगचं काम केलं होतं. त्यांच्या या कामाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ब्रिटीश दिग्दर्शक रिचर्ड ऑटेनबॉरो यांनी हा चित्रपट बनवला होता.

पन्नाशीच्या दशकात भानू अथैया सक्रीय होत्या. त्यांनी १०० पेक्षा जास्त चित्रपटात कॉस्ट्युम डिजायनिंगचं काम केलंय. ऑस्करशिवाय त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

अमिर खान यांची लगान आणि शाहरुख खान यांची स्वदेश या दोन्ही चित्रपटातही त्यांनीच कॉस्ट्युम डियाजनिंग केलं होतं. हे चित्रपट त्यांचे शेवटचे चित्रपट ठरले.

त्यांच्या मृत्यूनंतर ऑस्कर ट्रॉफी सुरक्षित राहावी याकरता त्यांनी २०१२ साली हा पुरस्कार परत करण्याचा विचार केला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: