पुण्यात पावसाचे धुमशान

पुणे : पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील बहुतेक भाग हा पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. रात्रभर संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर ओसरत असला तरी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यात आज पुन्हा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यात जिकडे तिकडे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचाच एक भयानक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी शहरात पूर आल्यासारखं पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. अनेक गाड्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. पुण्याच्या हिंगणेखुर्द परिसरातील हा व्हीडिओ आहे. संपूर्ण रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आज हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथकं सज्ज असून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरलेले आहे. पुण्यात परतीच्या पावसाने वेग धरला असून 2019 ची परिस्थिती पुण्यात पुन्हा होताना दिसत आहे. जोरदार पावसाने धुमाकूळ घातला असल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले.

Leave a Reply

%d bloggers like this: