महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीची पैगंबर जयंती अभिवादन मिरवणूक रद्द

पुणे, दि. १४ – हजरत महंमद पैगंबर जयंती (ईद – ए – मिलाद) निमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ( आझम कॅम्पस )तर्फे मागील १६ वर्षांपासून काढण्यात येणारी अभिवादन मिरवणूक या वर्षी कोविड विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. ३० ऑकटोबर रोजी पैगंबर जयंती आहे.
संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या मिरवणुकीत प्रेषित महमद पैगंबर यांच्या मानवतावादी, शिक्षण विषयक, पर्यावरणविषयक शिकवणुकीचे संदेश देण्यासाठी या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन केले जात होते .

संस्थेतर्फे दरवर्षी छ. शिवाजी महाराज, महात्मा गांधी, म.फुले, डॉ.आंबेडकर तसेच प्रेषित महमद पैगंबर या महामानवांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन मिरवणुका काढल्या जातात. आणि मानवतावादी संदेश दिले जातात

Leave a Reply

%d bloggers like this: