fbpx
Monday, June 17, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज १० हजार ५५२ नवीन रुग्ण; १९ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त

पुण्यात 528 नवीन पॉझिटिव्ह; 28 जणांचा मृत्यू

मुंबई, दि.१४ : राज्यात आज १९ हजार ५१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. आज दिवसभरात १० हजार ५५२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.७१ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट नोंदवली गेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७८ लाख ३८ हजार ३१८ नमुन्यांपैकी १५ लाख ५४ हजार ३८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.८३ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख ८० हजार ९५७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार १७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १५८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

पुणे शहर ..! ………- दिवसभरात 528 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 1413 रुग्णांना डिस्चार्ज.
– 28 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. – एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या -155595
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 10833
– एकूण मृत्यू – 3899
– एकूण डिस्चार्ज- 140863

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading