डॉ. पायल तडवी प्रकरण :तिन्ही आरोपींना निलंबित करण्याची ‘वंचित’ची मागणी

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. या प्रकरणी एंटी रॅगिंग कमिटीच्या रिपोर्टनुसार तीन आरोपींना सस्पेंड करण्याची मागणी वंचितने केली. पण अद्याप त्यावर कोणती कारवाई झाली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

अँटी रॅगिंग कमिटी जो रिपोर्ट दिला आहे त्यानुसार तीन आरोपींना सस्पेंड करायला हवे होते. पण नायर हॉस्पिटल, राज्य सरकार यांनी कोणतीही कारवाई केली नाही, कारवाई न करणं ही न्यायाची कुचेष्टा असल्याचे वचिंत बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलंय. 

यासाठी नायरच्या अधिष्ठातांची हकालपट्टी व्हावी अशी मागणी त्यांनी केलीय.तीन आरोपी पुन्हा आतमध्ये आल्यानंतर चौकशी वर प्रभाव पाडू शकतात असे त्या म्हणाल्या. या सगळ्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी हस्तक्षेप करणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासंदर्भात वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 

Leave a Reply

%d bloggers like this: