पुण्याचा युवा कीर्तनकार होनराज मावळे याचा प्रथम क्रमांक

पुणे : अखिल भारतीय नारदीय कीर्तन प्रसारक मंडळ , इंदूर आणि श्री दत्त भजन मंडळ , जबलपूर यांच्या वतीने अधिक मास युवा कीर्तन स्पर्धा २०२० स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुण्याचा युवा कीर्तनकार होनराज मावळे याने प्रथम क्रमांक पटकाविला. 
भारतातील विविध प्रांतातील युवा कीर्तनकारांनी स्पर्धेत भाग घेतला होता. सध्या हाथरसच्या महत्त्वाच्या विषयाला अनुसरून रांझाच्या पाटलाला शासन हे आख्यान होनराज मावळे याने घेतले होते. होनराज याने ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प न.चिं. अपामार्जने (बाबा) तसेच ह.भ. प विश्वासबुवा कुलकर्णी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, प्रा. संगिता मावळे यांच्याकडे कीर्तनाचे तर शाहीर हेमंतराजे मावळे यांच्याकडे शाहिरीचे प्रशिक्षण घेतले. 
अपामार्जने(बाबा), विवेक गोखले आणि अभय माणके यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. साहिल पुंडलीक(संवादिनी) , शिवम उभे(तबला) , मुकुंद कोंडे(झांज) यांनी साथसंगत केली.
होनराज मावळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात शास्त्रीय संगीत ह्या विषयात बी.ए. च्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तबला, ढोलकी, हार्मोनियम, पखवाज सह इतर २२ वाद्य त्याला वाजविता येतात.  श्री नारद विद्या मंदिर पुणे येथे नारदीय कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: