ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे हृदयविकाराने निधन

ठाणे, दि. 8 – ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आजगुरुवारी सकाळी 10.30 वाजता निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांच्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अविनाश खर्शीकर यांनी १९७८ ला बंदिवान मी या संसारी या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. मराठी सिनेसृष्टीत 90 च्या दशकातील चाहता कलाकार म्हणून ते परिचीत होते. तुझं आहे तुझ्यापाशी मधला ‘ श्याम’, वासूची सासू’ अशी नाटके गाजली. त्यांचं, झोपी गेलेला जागा झाला… हे नाटक फार गाजलं. सौजन्याची ऐशीतैशी, लफडा सदन, अपराध मीच केला ही नाटके आणि आधार, आई थोर तुझे उपकार, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार असे अनेक चित्रपट त्यांनी केले. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले यांच्यासह अनेक चित्रपटात त्यांनी काम केलंय.

Leave a Reply

%d bloggers like this: