सोनालिका ची  पहिल्या सहामाहीत ६३५६१  ट्रॅक्टर आणि २६५३० शेती अवजारे विक्री 

पुणे –  भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक आणि पहिल्या क्रमांकाची ट्रॅक्टर निर्यातदार सोनालिका ट्रॅक्टर्स ने सप्टेंबर २०२० मध्ये स्वतःचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आणि ट्रॅक्टर उद्योगाच्या विक्रीतील वृद्धीपेक्षा चांगली प्रगती नोंदविली आहे. देशातील पोषक वातावरण आणि परदेशी बाजारपेठेतील मागणीत वाढ यामुळे सोनालिका ने सप्टेंबर २०२० मध्ये एका महिन्यातील सर्वात जास्त म्हणजे  १७७०४ ट्रॅक्टर ची विक्री केली. कंपनीने एखाद्या सहामाहीतील सर्वाधिक म्हणजे  ६३५६१  ट्रॅक्टर आणि २६५३० अवजारे, एवढी विक्री केली. 

एखाद्या सहामाहीतील सर्वाधिक विक्रीबद्दल सोनालिका समूहाचे कार्यकारी  संचालक श्री रमण मित्तल म्हणाले, कि  सांगण्यास अभिमान वाटतो की सप्टेंबर  २०२० मध्ये  १७,७०४ ट्रॅक्टर विकून आम्ही एखाद्या महिन्यातील सर्वात जास्त विक्री करून एक ऐतिहासिक टप्पा नोंदवला आहे.  शेतकरी बंधूनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच आम्हाला महिन्यांमागून महिने विक्रीचे नवे विक्रम नोंदणे शक्य झाले आहे हे  आम्हाला उत्साहाने नमूद करायचे आहे.  आमची २०२०-२१ च्या पहिल्या सहामाहीत एकत्रित विक्री ६३५६१ ट्रॅक्टर एवढी होती. ही  कंपनीची एखाद्या सहामाहीतील सर्वाधिक विक्री आहे.  याबरोबर आमची शेती अवजारे विक्री २६५३०  होती. पूर्ण २०१९-२० या वर्षात केलेल्या विक्रीचा आकडा  आम्ही या  सहा महिन्यात ओलांडला.   

आम्ही अलीकडेच चार महिन्यात बाजारात आणलेल्या ट्रॅक्टर मुळे शेतक-यांच्या विविध पिकांसाठीच्या अपेक्षानुसार कामगिरी होऊन त्यांच्या उत्पादनात मोठी भर पडल्याचे सिद्ध झाल्यामुळे या ट्रॅक्टरना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. टायगर, सिकंदर डीएलएक्स, महाबली आणि छत्रपती या ट्रॅक्टरच्या हंगामाआधीच्या आणि नंतर च्या महामारीच्या काळात आमच्या व्यवसायवृद्धीत मोठा वाटा आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: