IPL 2020 – मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर शानदार विजय


अबुधाबी – आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 20व्या सामन्यात राजस्थान रॉयल विरुद्ध मुंबई इंडियन्स आज एकमेकांशी भिडले होते. मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानच्या संघाच्या गोलंदाजी सामना करत मुंबईच्या संघाने 193 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ केवळ 136 धावापर्यंत मजल मारू शकला. ज्यामुळे राजस्थानच्या संघाचा 57 धावांनी पराभव झाला आहे.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर चाहत्यांची मन जिंकली आहे. अबु धाबीच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्यात मुंबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे मुंबईचा संघ संकटात सापडला होता. मुंबई संघाचे सलामीवीर क्विंटन डी-कॉक, रोहित शर्मा हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक बाजू लावून धरत मुंबईचे आव्हान सामन्यात कायम राखले. कृणाल पांड्या आणि त्यानंतर हार्दिक पांड्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत सूर्यकुमारने मुंबईच्या संघाने 193 धावांचा टप्पा डोंगर उभा केला आहे.

या सामन्यात विजय मिळवून मुंबई इंडियन्सच्या संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाने 6 सामन्यात 4 विजय मिळून 8 गुण मिळवले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: