आंदगाव हायस्कूलमध्यील गरिब विद्यार्थ्यांना चार लाख रूपयांचे मोबाईल

पुणे दि. 30 – मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील आदिवासी व गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चार लाख रूपयांचे मोबाईल अँड. अनिल तांबे यांनी दिले. आँनलाईन शिक्षणामुळे मोबाईल ही गरज निर्माण झाली आहे
पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी मोबाईल दिले. येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. आँनलाईन शिक्षणासाठी त्यांना मोबाईल घेण्याची आर्थिक ताकद नाही. त्यामुळे तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते डाँ. यशराज पारखी व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र मारणे यांनी डोनेट मोबाईलचे आवहान केले. त्यावेळी अँड काळे यांनी प्रतिसाद देऊन मोबाईल दिले. यावेळी शाळेतील दहावीत शिक्षण घेणारे रोहन व शितल आखाडे यांना मोबाईल देण्यात आले. तालुक्यातील प्रत्तेक शाळेतील गरिब विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा प्रयत्न आहे. तसेच वापरात नसलेला मोबाईल अशा विद्यार्थ्यांना दान करावा असे आवहानडाँ. पारखी यांनी केले . तसेच वापरात नसलेला मोबाईल विद यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर यांनी पन्नास लँपटाँप तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्याचे जाहिर केले. यावेेळी संस्थेचे सचिव सतिश दरेकर, उपअध्यक्ष अंकुश मारणे, मारूती आटाळे, मुख्यध्यापक के. जे. पवार, एन. डी. मारणे, शाम मारणे उपस्थित होते.
