SSC Result – यंदा 10 वी चा निकाल 95.30 टक्के
पुणे, दि. 29 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या वतींर घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यंदा हा निकाल 95.30 % लागला आहे. यावर्षीदेखील बोर्डाच्या निकालामध्ये मुलींचं वर्चस्व पहायला मिळालं आहे. तर 9 विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे.

दरम्यान सध्या महाराष्ट्र शिक्षण राज्य मंडळाने केवळ निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर निकाल दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. कोकणाचा सर्वाधिक निकाल 98.77% आहे तर औरंगाबदचा निकाल सर्वात कमी म्हणजे 93% लागला आहे. 20 विषयांचा निकाल 100% लागला आहे. मार्च 2019 च्या तुलनेत यंदा 18.20 % निकाल अधिक लागला आहे.
विभागनिहाय बोर्डाचा संपूर्ण निकाल
कोकण – 98.77 टक्के
पुणे – 97.34 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
10 वी चा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
mahresults.nic.in / अन्य अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट यावर क्लिक करा. रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून सबमीट करा Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 तुम्हांला स्क्रिन वर दिसू शकेल.
महाराष्ट्रामध्ये यंदा 10वीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च अशी नियोजित होती. महाराष्ट्रात 9 विभागीय मंडळांमध्ये 10वीची परीक्षा होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागले .
