भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बीड, दि. २५ – येथील भाजापा ग्राम पंचायत सदस्य व उद्योजक कांता कारभारी गायके यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला.

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करीत असल्याचे भाजपचे ग्रामपंचायत सदस्य कांता गायके यांनी यावेळी सांगितले. आज झालेल्या एका कार्यक्रमात गायके यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी वंचितचे बीड जिल्हा अध्यक्ष शिवराज बांगर तसेच गेवराईचे तालुका अध्यक्ष सय्यद सुभान व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. कांता गायके यांच्या पक्ष प्रवेशामुळे शहर तसेच ग्रामीण भागात पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे प्रा. बांगर यांनी सांगितले.
