Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

वंचितच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंचवीस हजार मास्क व माहितीपत्रक वाटप

सोलापूर, दि. 24 – सोलापूर शहरात वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरामधल्या दाट झोपडपट्ट्या भागामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते मास्क व माहितीपत्रक वाटपाला आज बुधवार पेठ मिलिंद नगर याठिकाणी जय भिम वस्ती ,जय भिम वस्ती झोपडपट्टी या परिसरामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आले.

तसेच बाणेकरी तालीम, माशाळ वस्ती, 100 नंबर चाळ, सिद्धेश्वर हॉस्पिटल परिसर, कारंबा नाका परिसर,पठाण चाळ, कळके वस्ती,पांढरे वस्ती या भागामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये वाटप करण्यात येणार असून सोलापूर शहरातील लोकांनी कोरोणाची साखळी तोडण्यासाठी स्वतः शिस्त लावून मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असून ते शहरातल्या नागरिकांनी पाळले पाहिजे असे मत
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी यावेळी व्यक्त केले.

सदरच्या कार्यक्रमाच्या वेळी अशोक वेध, संजय गायकवाड अमित माने, संदीप कापुरे, विकी कांबळे साईनाथ मस्के सुरज कांबळे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading