Wednesday, October 28, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

‘त्या’ आजीबाई च्या मदतीला धावला रितेश देशमुख

कोरोना विषाणूमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनमुळे जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. देशातील अनेक शहरात परिस्थितीत अधिकच बिकट झाली आहे. बरेच लोक बेरोजगार झाले आहेत, असे बरेच लोक आहेत जे काही छोटी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला रस्त्यावर कसरती करताना दिसत आहे. ती अशा प्रकारे स्टंट्स करत आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. या वयातही पैशासाठी त्याला या सर्व गोष्टी करण्यास भाग पाडले जाते. परंतु त्या महिलेची आवड आणि आपुलकी पाहिल्यानंतर प्रत्येकजण अभिमान व्यक्त करतो. आज्जींच्या साहस आणि प्रतिभेचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर महिलेला ‘वॉरियर माँ’ म्हणून संबोधित करीत आहे.

आता या ‘वॉरियर माँ’ अभिनेता रितेश देशमुखच्या रूपाने आणखी एक चाहता सापडला आहे. रितेशने सोशल मीडियावर या वृद्ध महिलेचे केवळ कौतुकच केले नाही तर तो तिच्या मदतीसाठी पुढेही आला आहे. रितेशने महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारली. काही वेळात त्याला संबंधित आजींची माहिती मिळाली. त्याने ट्वीट केले आहे की त्याच्या टीमने या महिलेशी संपर्क साधला आहे. आता ते त्यांना कसे मदत करतात हे पाहिले जाईल.

Leave a Reply