fbpx
Saturday, April 27, 2024
Business

एचसीसीबीकडून कर्मचा-यांना सुरक्षित ठेवण्‍यासाठी कारखान्‍यांमध्‍ये विविध सुरक्षितता उपाय

पणजी, दि. २३ – अद्वितीय उपक्रम राबवण्‍याचा प्रयत्‍न करत हिंदुस्‍तान कोका-कोला बेव्‍हरेजेस (एचसीसीबी) या भारतातील आघाडीच्‍या एफएमसीजी कंपनीने त्‍यांच्‍या कारखान्‍यांमधील कर्मचा-यांमध्‍ये कोविड-१९चा प्रादुर्भाव प्रतिबंधित करण्‍यासाठी स्‍वतंत्र लहान गटांमध्‍ये काम करण्‍याची संकल्‍पना आंमलात आणली आहे. मानवी संपर्क टाळण्‍यासाठी आणि कोविड-१९ संसर्गित कर्मचा-यांना ओळखून त्‍यांना त्‍वरित वेगळ्या कक्षामध्‍ये ठेवण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी या संकल्‍पनेची अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. प्रत्‍येक कर्मचा-याला आत्‍मनिर्भर बनवण्‍यासाठी हे लहान गट तयार करण्‍यात आले आहेत. ज्‍यामुळे एका गटामधील व्‍यक्‍तीचा दुस-या गटातील व्‍यक्‍तीशी संपर्क होण्‍याची शक्‍यता दूर होते. कंपनीने भारतातील १५ ठिकाणी असलेल्‍या त्‍यांच्‍या सर्व कारखान्‍यांमधील कर्मचारी व इतर भागीदारांच्‍या परिपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेण्‍यासाठी अंमलात आणलेल्‍या विविध अद्वितीय सुरक्षितता उपायांचा हा एक भाग आहे.

सुरूवातीला एचसीसीबीने त्‍यांच्‍या कारखान्‍यांच्‍या जोखीम घटकांचे सविस्‍तर मूल्‍यांकन केले आणि विशिष्‍ट कामांसाठी लोक एकमेकांसमोर येऊ शकतील असे हॉट स्‍पॉट्स ओळखले. कंपनीने काही कर्मचा-यांसाठी वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले. प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणून कंपनीने कामाची पुनर्रचना केली व या सर्व असुरक्षित ठिकाणी लोकांचा संपर्क कमी करण्‍यासाठी कामामध्‍ये बदल केले. कंपनीने हॉट स्‍पॉट्स ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांना फेस शील्‍ड्स व हँड ग्‍लोव्‍ह्ज असे पर्सनल प्रोटेक्टिव्‍ह इक्विपमेंट परिधान करणे बंधनकारक केले आहे.

याव्‍यतिरिक्‍त एचसीसीबीने सामान्‍य शिफ्ट्स रद्द केल्‍या आहेत, आवश्‍यकतेनुसार प्रमाणित कार्यसंचालन पद्धतींमध्‍ये (एसओपी) बदल केले आहेत, कॅन्टिन्‍समध्‍ये सोशल डिस्‍टन्सिंगसाठी तरतूदीसह वेळेसंदर्भात कडक नियम आणले आहेत, वैयक्तिक किंवा कार्यालयीन वाहनांमध्‍ये लोकांची संख्‍या मर्यादित केली आहे आणि एक-मार्गी ये-जा केल्‍यामुळे कर्मचा-यांचा होणारा संपर्क टाळण्‍यासाठी कारखान्‍यामध्‍ये प्रवेश करण्‍याकरिता आणि बाहेर जाण्‍याकरिता वेगवेगळे गेट्स तयार केले आहेत. कारखान्याच्‍या संपूर्ण परिसराचे नियमित सॅनिटायझेशन व सखोल स्‍वच्‍छता करण्‍यासोबत कंपनीने कर्मचा-यांना सोशल डिस्‍टन्सिंग राखण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी चालणा-या व कार्यरत भागांमध्‍ये स्‍पष्‍टपणे दिसणारी चिन्‍हे आखली आहेत. संवेदनशील प्रक्रिया क्षेत्रांमध्‍ये प्रवेश करणा-या कर्मचा-यांसाठी सॅनिटायझेशन प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्‍यासोबत एचसीसीबीने विषाणूंचा संपर्क होण्‍याच्‍या कोणत्‍याही शक्‍यतेला प्रतिबंध करण्‍यासाठी सर्व कारखान्‍यांमधील दरवाज्‍यांची हाताळणी करताना फूट पेडल्‍स व डोअर स्‍टेप्‍सची सुविधा केली.

एचसीसीबीने एक अॅप सादर केले आहे. हे अॅप कर्मचा-यांना त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत दररोज अद्ययावत माहिती देते. अॅप कर्मचा-यांना स्थितीनुसार कोविड-१९ संबंधित धोरणे व प्रतिबंधात्‍मक उपायांबाबत सांगते. इतर उपायांसंदर्भात एचसीसीबीने कारखान्‍यामध्‍ये प्रवेश करणारी सर्व वाहने व सामानांचे निर्जंतुकीकरण करण्‍याची सुविधा अंमलात आणली. तसेच प्रत्‍येक कारखान्‍यामध्‍ये सरकारी नियमानुसार कोविड१९ संबंधित लक्षणे दिसून येणा-या कर्मचा-यांसाठी वेगळा कक्ष आहे. कंपनीने कामाशी संबंधित कोणताही प्रवास किंवा कोणतीही व्‍यक्‍ती, सहकारी वा अभ्यागतांसोबत कारखान्‍याच्‍या आतमध्‍ये वैयक्तिक मीटिंग करणे टाळण्‍यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्‍या.

कारखान्‍यांमधील सुरक्षितता उपायांच्‍या महत्त्वाबाबत बोलताना एचसीसीबीच्‍या आरोग्‍य, सुरक्षा व स्‍वास्‍थ्‍य विभागाचे उपाध्‍यक्ष जी. एस. रघु म्‍हणाले, ”आमच्‍या कंपनीचा सुस्‍पष्‍ट आदेश आहे की, आमचे कर्मचारी व भागीदार, तसेच ग्राहक, पुरवठादार व समुदायांच्‍या जीवनापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण काहीच नाही. आम्‍ही सरकारने निर्धारित केलेले फेस मास्‍क्स परिधान करणे, हात सॅनिटाईज करणे व सोशल डिस्‍टन्सिंग पाळणे अशा वैयक्तिक आरोग्‍यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍याशी कटिबद्ध आहोत. म्‍हणूनच आम्‍ही संसर्गाचा धोका कमी करण्‍यासाठी आवश्‍यक विविध उपायांची अंमलबजावणी केली आहे.

हाती घेतलेल्‍या प्रतिबंधात्‍मक उपायांना पुढे घेऊन जात एचसीसीबीने त्‍यांच्‍या कारखान्‍यांच्‍या अंतर्गत व्‍हर्च्‍युअल सुरक्षितता ऑडिट करण्‍यासाठी एक पद्धत डिझाइन केली आणि तिची अंमलबजावणी केली. असेच एक ऑडिट कोका-कोला सिस्‍टमची वेगळी कंपनी ग्‍लोबल ऑडिट ऑर्गेनायझेशनने केले आहे. इतर आत्‍मविश्‍वास निर्माण करणा-या उपायांसह एचसीसीबीने कंपनीच्‍या कर्मचारी विमा योजनेअंतर्गत कोविड-१९ साठी उपचाराकरिता विमासंरक्षण मिळण्‍याची खात्री घेतली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading