मराठी ऱॅप “भानकाम” प्रेक्षकांच्या भेटीस
हाँगकाँग मधील म्युजिक कंपनी बीएनके रेकॉर्ड घेऊन आली आहे मराठी रॅप गाणे भानकाम, संगीतकार आणि गायक कार्तिक यांचे हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. मुंबईत वाढलेले कार्तिक हे १६ वर्षाचे होते जेव्हा त्यांनी संगीत शिकले आणि गिटार सुरू केले. बारावीनंतर ते अमेरिकेत गेले आणि शिकागो येथील इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दाखल झाले. अमेरिकेत असताना कार्तिकला स्पोकेन फॉल्स कम्युनिटी कॉलेजमध्ये अल्पवयीन म्हणून संगीत शिकण्याची संधी ही मिळाली.

कार्तीक म्हणतात, मी सध्या हाँगकाँगचा रहिवासी आहे आणि “भानकाम” म्हणून ओळखले जाणारे माझे पहिले मराठी रॅप सिंगल रिलीज करण्यास खरोखर उत्सुक आहे, मला आशा आहे की संगीत प्रेमी आणि श्रोत्याला हे आवडेल आणि या ट्रॅक साठी मला त्यांचे प्रेम मिळेल. हे गाणे युट्यूब वर आणि ऑडिओ ट्रॅक म्हणून उपलब्ध असेल जे डाउनलोड आणि शेयर देखील करता येईल. हा ट्रॅक अमेरिकेहून परत आल्यावर भारतातील माझा प्रवास आणि वास्तववादी अनुभवांबद्दल बोलतो. हे एक मराठी रॅप आहे आणि मला खात्री आहे की तरुण पिढी हा खोडकर ट्रॅक ऐकण्याचा आनंद घेईल. ” हा व्हिडीओ हाँगकाँग आणि कौलूनच्या आसपासच्या नयनरम्य ठिकाणी दाखविण्यात आला आहे. व्हिडीओ शूट, संपादन 25 दिवसांच्या कालावधीत करण्यात आले. हे गाणे कार्तिक द्वारा लिहिलेले आणि गायले गेले आहे, जे एका आठवड्याचा कालावधीत पूर्ण झाले. कार्तिक म्हणाले, “मी हिंदीमध्ये माझ्या पुढच्या सिंगलवर काम करत आहे आणि हॉंगकॉंगमधील माझी बीएनके रेकॉर्डझ भारतातील नवीन प्रतिभा शोधत आहे, मग ते गायक, संगीतकार किंवा कलाकार असो.” कार्तिकची दुसरी बाजू होती ती म्हणजे कार्तिक जादूगर देखील आहेे. डेव्हिड ब्लेन व्हाईट यांच्यापासुन ते प्रेरित झालेे आहेत जे अमेरिकन विख्यात कलावंत आहेत. कार्तिकने भारत, अमेरिका, व्हिएतनाम आणि हाँगकाँगमधील विविध कार्यक्रमांमध्ये जादू कार्यक्रम सादर केले आणि जमावाला मंत्रमुग्ध केले आहे. कार्तिक म्हणाले, “हो मी जादूगार असण्यापेक्षा जास्त काळ संगीतकार होतो. संगीत आणि जादू आयुष्यभर माझ्याबरोबर प्रवास करत राहिली .
