fbpx
Monday, June 17, 2024
NATIONAL

UAE मध्ये कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी होणार

अबुधाबी, दि. 18 – कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्यामुळे कोरोनावर प्रतिबंध म्हणून लस शोधण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहेत. अमेरिका, भारत, रशियासारख्या देशाने लस शोधण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आणखी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली असून तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेली ही पहिलीच लस आहे.

ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील नागरिकांसहित प्रवाशांना ही लस देण्यात आली. नोंदणी करण्यात आलेल्या १५ हजार जणांना गुरूवारी अबू धाबीमधील शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये ही लस दिली. ज्या ठिकाणी संक्रमणाची संख्या अधिक असते त्या ठिकाणी त्या लसीचा प्रभाव पाहण्यासाठी वैद्यकीय चाचण्या लवकर घेतल्या जात असल्याची माहिती चीनमधील तज्ज्ञ ताओ लीना यांनी ग्लोबल टाईम्सशी बोलताना सांगितलं. दुबईमधील दी ४२ हेल्थकेअर आणि चीनमधील सायनोफार्म कंपनीने एकत्रितरित्या ही लस तयार केली आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडे या लसीची नोंदणी करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जवळपास २०० देशांच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत १८ ते ६० वर्षापर्यंतच्या वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading