लक्ष्मणराव आपटे प्रशालेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम
विज्ञान शाखेत हर्ष अन्वेकर तर वाणिज्य शाखेत अथर्व मेहता प्रथम
पुणे, दि. १८ लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाची उज्ज्वल यशाची परंपरा यंदा देखील कायम असून यावर्षी सुद्धा महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मार्च २०२० च्या १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले. लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल ९८.६५% एवढा लागला असून विज्ञान शाखेचा निकाल ९९.१३ % आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९७.०५ % लागला.
महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल पुढीलप्रमाणे – १) हर्ष अन्वेकर – ९३.०७ टक्के २) प्रांजल रसाळ – ९२.३० टक्के ३) मृणाली आढळ – ९२.१५ टक्के ४) साहिल कंधारे- ९१.२३ टक्के ५) दिलनाज अत्तार – ९०.१५ टक्के
वाणिज्य शाखेचा निकाल – १)अथर्व मेहता – ९३.०० टक्के २) प्रद्युम्न गायकवाड – ९१.०० टक्के ३) सिमरन ढोका- ९०.०० टक्के