Tuesday, September 1, 2026
ENTERTAINMENT

आलियाने केला नवाजुद्दीनच्या अफेअर्स चा भांडाफोड

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दकीन सिद्दिकी लॉकडाऊनच्या काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आला होता. ऐन लॉकडाऊनमध्ये नवाजची पत्नी आलिया हिने त्याला घटस्फोटाची नोटीस बजावली होती. पोटगीमध्ये कोटींच्या संपत्तीची मागणी करतानाच तिने नवाजवर गंभीर आरोपही केले होते. आता पुन्हा एकदा आलियाने नवाजची पोलखोल केली आहे. आलियाने तिच्या बाळंतपणावेळीही नवाज प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याचा खुलासा केला आहे.

आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत ही बाब समोर आली आहे. तिने सांगितले की, मी जेव्हा गरोदर होते. मला डॉक्टरांकडे स्वतः गाडी ड्राईव्ह करत जावे लागत होते. डॉक्टरही मला म्हणाले की तुम्ही आगळ वेगळ धाडस केल आहे. बाळंतपणासाठी एकट्याच आलात. नवाजबाबतच्या सर्व गोष्टी मला त्याच्या भावाकडून समजल्या. त्याच्या वैयक्तीक आयुष्याबाबत ते सर्व मला सांगत होते. पण मी नवाजला हे कधीही सांगू शकले नाही की मला त्याच्या अफेअरबद्दल माहिती आहे. तरीही आमच्यात नेहमी भांडणं होत होती.

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांची पत्नी आलिया हिने नवाजला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. आलियाने नवाजकडे तब्बल ३० कोटी रुपये पोटगी आणि मुंबईतील यारी रोड परिसरात ४ बीएचके फ्लॅटची मागणी केली होती. यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टनुसार आलियाने नवाजकडे दोन्ही मुलांचा ताबा आणि ३० कोटी रुपये मागितल्याचे समोर आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading