राजगृहा वरील भ्याड हल्ल्याचा विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे यांनी केला जाहीर निषेध.
मुंबई, दि. ८ – राष्ट्र निर्माते भारतरत्न विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह या निवास स्थानावर काल कांही अज्ञात समाजकंटकानी हल्ला केला आहे.या हल्ल्याचा भारतीय संविधान राष्ट्रविकास अभियानचे राष्ट्रीय समन्वयक विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे.

माथेफिरूनी केलेल्या या हल्ल्यात राजगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. दगडफेक करुन खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.झाडांच्या कुंड्या तोडुन अस्ताव्यस्त करण्यात आल्या आहेत. हल्लेखोरानी समोर लावलेले cctv कॅमरे सुध्दा तोडन्याचा प्रयत्न केला आहे.हे हल्लेखोर सीसीटीव्हीत स्पष्ट पणे दिसत आहेत.
देश विदेशातील आंबेडकरी अनुयायांचे व समस्त भारतीयांचे श्रद्धा आणि प्रेरणा स्थान असलेल्या याच पवित्र राजगृहात महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांच्या हजारो ग्रंथांचा संग्रह एकत्रित करून ठेवलेला आहे.जगातील वैयक्तिक स्वरुपाचे हे सर्वात मोठे ग्रंथालय आहे. अशा या ऐतिहासिक पवित्र स्थळावर झालेल्या हल्ल्याचा विद्याभुषण डाँ प्रशांत पगारे यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून या घटनेची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.
