Sunday, June 21, 2026
PUNE

पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 8 :- पुणे विभागातील 23 हजार 88 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 38 हजार  411  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 14 हजार 2 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 615 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.11 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.44 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 पुणे जिल्हयात 31 हजार 994 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 19 हजार 319 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 751 आहे. कोरोनाबाधित एकूण 924 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 450 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.38  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.89 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 569, सातारा जिल्ह्यात 46, सोलापूर जिल्ह्यात 68, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 45 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
 सातारा जिल्हयात कोरोना बाधीत 1 हजार 418 रुग्ण असून 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 499 आहे. कोरोनाबाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 सोलापूर जिल्हयात 3 हजार 439 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 871 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 259 आहे. कोरोना बाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हयात कोरोना बाधीत 532 रुग्ण असून 277 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.       ॲक्टीव रुग्ण संख्या 242 आहे. कोरोना बाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 कोल्हापूर जिल्हयात 1 हजार 28 कोरोना बाधीत रुग्ण असून 762 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.  ॲक्टीव रुग्ण संख्या 251 आहे. कोरोना बाधित एकूण 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 16 हजार 348 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 15 हजार 67 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 442 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 73 हजार 126 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 38 हजार 411 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.  

( टिप :- दि. 8 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading