Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

औंढा नागनाथ येथे रिपब्लिकन सेनेचे अर्धनग्न आंदोलन

औंढा नागनाथ( जि. हिंगोली), दि. 8 – येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून आज दिनांक 8 जुलै रोजी दुपारी चार वाजता औंढा तहसीलदार सचिन जोशी यांना निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनामध्ये सविस्तर वृत्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले व सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब वास्तव्यास आसलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. हि घटना अतिशय निद़निय आसुन तात्काळ हल्लेखोरांना अटक करावी व राजग्रहाला कायमस्वरूपी zप्लस पोलीस संरक्षण द्यावे,या निवेदनावर किरण घोंगडे रिपब्लिकन जिल्हाप्रमुख हिंगोली ,आकाश सुतारे ,गोरख खिल्लारे,सागरदादा इंगोले,सुनील खंदारे.बाळु गायकवाड,यशवंतराव साळवे,अशिष मुळे,पंडित सर्यतळ,अनिल जमधाडे, असंघ घोंगडे, नागनाथ घोंगडे, बाळासाहेब साळवे, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या .यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भारत घ्यार, यशवंत गुरुपवार, बालाजी नरोटे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading