चिंताजनक पुण्यात दिवसभरात ११४७ कोरोनाबाधित, १९ मृत्यू
पुणे, दि. ८ – कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुणे शहरात कमी होताना दिसत नाही. अन लॉक नंतर शहरात दररोज ८०० च्या आसपास रुग्ण संख्या वाढत आहे. बुधवारी शहरात रेकॉर्डब्रेक १ हजार १४७ कोनाबाधित रुग्ण वाढले आहेत.

- दिवसभरात ११४७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ५८७ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात १९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- ४०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २४१६८. (डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२३२११ आणि ससून ९५७)
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८४००.
- एकूण मृत्यू -७७०.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १४९९८.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३९५० आणि ॲंटिजेन किटद्वारे ७७७.
