fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

सत्ताधारी भाजपा नगरसेविकेचे बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांचे मुख्य मंत्र्यांना, आयुक्तांना निवेदन; नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

पुणे, दि. ६ – सत्ताधारी भाजपा नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि त्यांच्या पतीने जनसंपर्क कार्यालयासाठी केलेले बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांचे मुख्य मंत्र्यांना, आयुक्तांना निवेदना द्वारे केली आहे. सोमवारी पुणे पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून निलेश प्रकाश निकम यांनी ही मागणी केली आहे.

कळमकर यांनी सर्वे नंबर -८७,गणराज चौक आरबो हॉटेल समोर, बाणेर येथे बेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक बांधकाम संपर्क कार्यालयासाठी केले. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक-९ या नगरसेविका सौ. ज्योती गणेश कळमकर या सन – २०१७ मधील भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत पुणे म.न.पा मध्ये बहमत देखील भारतीय जनता पक्षाकडे असल्याकारणामुळे आपल्या अनधिकृत बांधकामावर कोणीही कारवाई करणार नाही या विश्वासाने या सदस्याने आपल्या प्रभागात आपल्या स्वतःसाठी व त्यांचे पती गणेश ज्ञानोबा कळमकर (सदस्य,भारतीय जनता पार्टी) यांनी प्रशासनाची नियमानुसार कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पक्क्या स्वरूपाचे वेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक बांधकाम व पक्षाचे संपर्क कार्यालय उभारले आहे.

नुकतेच त्याचे उद्घाटन देखील झाले आहेत पण माहिती घेतल्यानंतर असे निदर्शनास आले की हे कार्यालय ज्या ठिकाणी बांधले आहे तेवढ्या क्षेत्रफळा साठी पुणे म.न.पा परवानगी देऊ शकत नाही एवढेच त्या जमिनीचे क्षेत्रफळ छोटे आहे असे असून देखील माननीय सदस्य त्या जागेत ग्राउंड प्लस ०२ असे अंदाजे १००० ते १२०० स्क्वेअर फुट बांधकाम अनधिकृत रित्या केले असून तसेच बेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक बांधकाम केले गेलेल्या संपर्क कार्यालयासाठी पुणे महानगरपालिकेच्या खर्चातून दिशादर्शक बोर्ड सुद्धा लावण्यात आला आहे व पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सदर बाब ही लक्षात का आली नाही बेकायदेशीर कार्यालयाला सुद्धा पुणे महानगरपालिकेकडून दिशादर्शक बोई लावला जातो ही बाबधक्कादायक आहे.

. आपल्या नगरसेवक पदाचा , सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पाटीध्या पक्षाच्या दबावाचा वापर करून त्या बेकायदेशीर संरचनात्मक बांधकामास नळजोडणी ,वीज जोडणी मिळवली आहे. हे बांधकाम बेकायदेशीर आणि अनधिकृत सरचना मुळे त्याला कुठल्याही प्रकारचे पूर्णत्वाचा दाखला (Completion Certificate) आणि भोगवटा पत्र (Occupancy Certificate) नसतानाही त्या बांधकामाचा उपयोग जनसंपर्क कार्यालय म्हणून केला जात आहे.

तसेच त्या कार्यालयात नरेंद्र मोदी (पंतप्रधान,भारत सरकार), अमित शाह (गृह मंत्री,भारत सरकार) नितिन गडकरी (केंद्रीय मंत्री,भारत सरकार), गिरीश बापट (खासदार, पुणे शहर ), देवंद्र फडणवीस ( विरोधी पक्षनेते) .ज. पा नइडा (भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष), चंद्रकांत पाटील (अध्यक्ष भा .ज.प, महाराष्ट्र राज्य),मुरलिधर मोहळ (महापौर, पुणे) यासारखे अनेक भा.ज.प. बड्या नेत्यांचे फोटो लावलेले भाहेत तसेच त्याबाबतच्या भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाचा वापर केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या विद्यमान सदस्य यांनी आपल्या पालिकेच्या पदाचा गैरवापर करून तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ (१९६६ चा महा. ३७) याचा आधीनियमांखाली करण्यात आलेल्या नियमांचा उपयोग विधींच्या तरतुदीचा जाणीवपूर्वक भंग केलेला आहे म्हणून त्यांचे पुणे म न.पा सदस्य पद रद्द होण्याबाबत प्रशासकीय स्तरावरून कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी निलेश प्रकाश निकम यांनी या निवेदनात केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या सदर बाब लक्षात का आली नाही तसेच पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असून शांतपणे बघ्याची भूमिका घेत आहे का अथवा यामध्ये कुठलं आर्थिक देवन घेवन झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

त्वरित सदर बेकायदेशीर आणि अनधिकृत संरचनात्मक केलेले बांधकाम पाडण्यात यावे व व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे , पुढील १० दिवसात सदर बेकायदेशीर केलेल्या बांधकामावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक-1/09२०२० रोजी पुणे महानगरपालिकेत तीन आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading