चिंता कायम; राज्यात रविवारी ६ हजार ५५५ नवीन कोरोना रुग्ण, तर १५१ मृत्यू
पुण्यात ८५२ कोरोनाबाधित, १२ मृत्यू तर ४२० कोरोनामुक्त
मुंबई, दि.५: राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले १५१ मृत्यू हे मुंबई मनपा-६९, ठाणे-१ ठाणे मनपा-३, कल्याण-डोंबिवली मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-४, नाशिक-२, धुळे-४,जळगाव-६,जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-८, सोलापूर मनपा-४, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-१० या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
५ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
……….
- दिवसभरात ८५२ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ४२०
- बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – १३१०९ - आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १२
- पुण्यातील एकूण मृत्यू – ७१५
- शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ४१०
- व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ७०
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २१५२०
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ७६९६
- आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ६११
- आज पर्यंतच्या एकूण करोना चाचण्या १३२८१६
