fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRA

कोरोना – राज्यात आज ६ हजार ३३० रुग्ण, १२५ मृत्यू

पुण्यात दिवसभरात ९३७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा पार

मुंबई, दि.२: राज्यात आज कोरोनाच्या  ६ हजार ३३० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात  ७७ हजार २६० रुग्णांवर (ॲक्टिव्ह ) उपचार सुरू आहेत. आज ८०१८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. राज्यात कोरोनाच्या चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज सोडण्यात आलेल्या ८०१८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७०३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात आज १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३८ टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खाजगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत असून दर दशलक्ष लोकसंख्येमागे राज्यातील चाचण्यांचे प्रमाण ७७१५ एवढे आहे. हे प्रमाण देशपातळीवर ६३३४ एवढे आहे. १ जुलै २०२० देशभरात ९० लाख ५६ हजार १७३ प्रयोगशाळा चाचण्या झाल्या असून त्यातील ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १० लाख  २० हजार ३६८ नमुन्यांपैकी  १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह (१८.२९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७२ हजार  ३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मागील ४८ तासात झालेले १२५ मृत्यू हे मुंबई मनपा-५७, ठाणे-१, ठाणे मनपा-४, जळगाव-६, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी चिंचवड मनपा-१, सातारा-२,कोल्हापूर-१, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-९, जालना-२, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

२ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
……….

  • दिवसभरात ९३७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ६३१
  • बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
    एकूण रुग्ण – ११६७१
  • आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १४
  • पुण्यातील एकूण मृत्यू – ६७६
  • शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ३४४
  • व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ५६
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – १९४२
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ६६९५

आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ४१४०

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading