डॉ.पी.ए.इनामदार आयएएस सेंटरच्या स्पर्धा परीक्षा ऑन लाईन प्रशिक्षणास प्रारंभ
पुणे, दि. 1 – महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.पी.ए.इनामदार आयएएस सेंटर च्या स्पर्धा परीक्षा ऑन लाईन प्रशिक्षणास प्रारंभ झाला आहे.सेंटर चे संचालक प्रशांत चव्हाण यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यापासून ते स्पर्धापरीक्षा मार्गदर्शनाच्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोग,राज्य लोकसेवा आयोग परीक्षांच्या तयारीसाठी या सेंटरच्या अभ्यासक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तज्ञ,प्राध्यापक तसेच सेवेत कार्यरत अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.२९ जून रोजी २ महिन्यांच्या फौंडेशन कोर्स चा प्रारंभ झाला,तर वर्षभराच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठीच्या अभ्यासक्रमाला लवकरच सुरुवात होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 7028896981या वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.