Monday, June 22, 2026
PUNE

पुणे शहरातील “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्ट  पथदर्शी ठरेल – सतेज पाटील

वाहतूक राज्यमंत्र्यांकडून “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्टचे स्वागत

पुणे, दि. २८ – पुणे शहरात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी कमकरण्यासाठी महापालिका आणि व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. यांच्या वतीने आगामी काळात राबविण्यात येणारा “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग” प्रोजेक्ट पथदर्शीठरेल,राज्याचा परिवहन राज्यमंत्री म्हणून मी या उपक्रमाचे कौतुक करतो आणि अशा पर्यावरण पूरक उपक्रमांना शासनाचे नक्कीच पाठबळ राहील, अशा शब्दात रविवारी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रकल्पाच्या घोषणेचे स्वागत केले.
26 जून रोजी पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने या प्रकल्पाला मंजुरी दिल्यावर आज यासंबंधीचे ट्विट परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी केले.

शहरामध्ये वाढते प्रदुषण व वाढती वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी व्ही-ट्रो मोटर्स प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातुन ‘ग्रीन पुणे’ संकल्पनेसाठी “इलेक्ट्रिक बाईक रेंटींग प्रोजेक्ट” हि संकल्पना पुणे शहरामध्ये राबविण्यात येणार असुन या इलेक्ट्रिक बाईक ने प्रवास करण्यास केवळ कमीत कमी ९० पैसे प्रती कि.पासुन जास्तीत जास्त ४ रु प्रती किमी खर्च पुणेकरांना येणार आहे .या प्रोजेक्ट मधून माफक भाड्यात इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध होणार आहेत.तसेच या कंपनीच्या माध्यमातून या बाईक विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असतील.
हा प्रकल्प राबविण्यासाठी एका ठिकाणी १० बाईक चार्ज होतील, असे मुख्य रस्त्यावर एक चार्जींग स्टेशन अशा प्रकारचे पुणे शहराच्या विविध भागामध्ये मुख्य रस्त्यांवर ५०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास मान्यता पुणे शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात पुणे मेट्रो ने प्रवास करणार्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असुन एकुणच शहरातील वाहतुक कोंडी, प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे सदर प्रकल्पासाठी पुणे मनपा ला कोणतीही आर्थिक गुंतवणुक करावी लागणार नाही. परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन आपल्या ऑफिशियल ट्वीटर अकौंट वरून उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading