Sunday, June 21, 2026
PUNE

चीनचा निषेध करीत रंगावलीतून दिला स्वदेशीचा नारा

पुणे, दि. २७ : चीनला धडा शिकविण्यासाठी पुणेकरांनी  चायनीज वस्तूंवर बहिष्कार घाला आणि स्वदेशी वस्तूंचा स्विकार करा हा संदेश देत स्वदेशीचा स्विकार चिनी वस्तुंचा बहिष्कार या संकल्पनेवर  भव्य रंगावली साकारण्यात आली होती. टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही रंगावली साकारण्यात आली.
ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र, शिक्षण प्रसारक मंडळी आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.   यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र. मंडळीचे अ‍ॅड. मिहीर प्रभुदेसाई, सतिश पवार, प्रा.दिलीप शेठ, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर, अमोल साठये, संजय सातपुते, सूर्यकांत पाठक, वैभव वाघ, सचिन जामगे,  मंदार रांजेकर, अमर लांडे  उपस्थित होते.
पराग ठाकूर म्हणाले, स्वदेशी वस्तू जास्तीत जास्त वापरायला हव्यात, हाच चीन विरोधातील भारतीयांचा लढा असेल. चीन ने घुसखोरी केली आणि आपल्या सैनिकांवर गोळ््या झााडल्या. आपण चायनीज वस्तू खरेदी करतो त्यातून येणारे पैसे चीन आपल्या विरुद्ध गोळया चालवायला वापरतो. सीमेवर सैन्य लढेल आपण चायना मेड वस्तूंवर बहिष्कार घालू.  बहिष्कार घातल्याने ३ हजार ८०० कोटींचा फटका चीनला बसलाय.  त्यामुळे देशभक्त नागरिकांनी स्वदेशीचा स्विकार करा.
महेश करपे म्हणाले, चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीयांची एकजूट आवश्यक आहे. चीनच्या सर्व वस्तूंचा बहिष्कार आपण करायला हवा. स्वदेशी वस्तूंचा वापर करणे हेच चीन ला उत्तर असेल.  चीनची आर्थिक बाजू मोडकळीस आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading