fbpx

पुण्यात मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

पुणे, दि. २५ – मागील काही दिवसात पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात फिरताना जे नागरिक मास्क घालणार नाही, अशा नागरिकांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश क्षेत्रीय स्तरावरील अधिकार्‍यांना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज वाढ होत आहे, त्यातच ही वाढ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करताना प्रशासन दिसत आहे. पण तरी देखील रुग्ण संख्या वाढत आहे. आता शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणार्‍या सर्व प्रमुख, उप आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालय मास्क न घालता. नागरिक आढळून आल्यास त्यावर ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, असा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: