ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज आहे HBD, जाणून घेऊ आणि बघुयात तिच्या काही दिलखेचक अदा
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस आहे. २५ जून १९८६ रोजी सांगलीत सईचा जन्म झाला.
या गोजिरवाण्या घरात’ मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. ‘अनुबंध’, ‘अग्निशिखा’, ‘तुझं माझं जमेना’, ‘साथी रे’ या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे.
‘सनई चौघडे’ या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले.
सई ताम्हणकरला टॅटूची फार आवड आहे. तिने तिच्या खांद्यावर रोमन लिपीत दोन तारखा गोंदल्या आहेत.
मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’ चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती.
स्वप्निल जोशीसोबतची सईची जोडी चाहत्यांना फारच आवडली. या जोडीने एकत्र तीनच चित्रपट केले आहेत. पण, त्यांच्यातील केमस्ट्रिने चाहत्यांची मनं जिंकण्यात यश मिळवलं.
मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Photo credit @saeitamhankar