fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

रिपीट्स बंद ओरिजनल सुरु; स्टार प्रवाहवरील  मालिकांचे नवे एपिसोड्स लवकरच येणार भेटीला

कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण आणि तितकेच उत्कंठावर्धक एपिसोड्स घेऊन स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार, आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, मोलकरीण बाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वैजू नंबर वन या मालिका सज्ज आहेत. आपल्या आवडत्या मालिका पहाण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकीच उत्सुक आहेत कलाकार मंडळी.

रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे आपल्या सहकलाकारांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा ऑनएअर गेला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आता शूटिंग सुरु झाल्यानंतर असणार आहे. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. दररोज रात्री आठ वाजता रंग माझा वेगळा मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे असं रेश्मा म्हणाली.

सर्वांची लाडकी आई म्हणजेच आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले प्रभुलकर सेट आणि सर्व सहकलाकारांना खूप मिस करत होत्या. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मनात प्रचंड उत्सुकता आहे. कधी एकदा सेटवर जातेय असं झालंय अशी प्रतिक्रिया मधुराणी यांनी व्यक्त केली.

तेव्हा तुमच्या आवडत्या मालिका आणि पात्रांना भेटण्यासाठी सज्ज व्हा लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

%d bloggers like this: