fbpx
Saturday, April 27, 2024
MAHARASHTRA

कोरोना – महाराष्ट्राने ओलांडला 90 हजार रुग्णांचा टप्पा, आज 120 बळी

पुण्यात 143 नवीन तर 119 कोरोना मुक्त

मुंबई, दि. 9 – राज्यात आज 1663 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 42 हजार 638 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. आज कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 90 हजार 787 इतका झाला आहे. पैकी सध्या 44 हजार 849 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज झालेल्या मृत्यूपैकी 49 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 11 मे ते 6 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 71 मृत्यूपैकी मुंबई 45, ठाणे 11, मीरा भाईंदर 6, औरंगाबाद 3, पनवेल 2, नाशिक, रत्नागिरी, वसई विरार येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 77 हजार 819 नमुन्यांपैकी 90,787 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 68 हजार 073 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 470 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 90,787

मृत्यू – 3289

मुंबई महानगरपालिका- 51,100 (मृत्यू 1760)

ठाणे- 1329 (मृत्यू 23)

ठाणे महानगरपालिका- 5171 (मृत्यू 131)

नवी मुंबई मनपा- 3695 (मृत्यू 87)

कल्याण डोंबिवली- 1977(मृत्यू 36)

उल्हासनगर मनपा – 570 (मृत्यू 21)

भिवंडी, निजामपूर – 342 (मृत्यू 12)

मिरा-भाईंदर- 979 (मृत्यू 45)

पालघर- 221 (मृत्यू 6 )

वसई- विरार- 1415 (मृत्यू 37)

रायगड- 764 (मृत्यू 29)

पनवेल- 736 (मृत्यू 29)

नाशिक – 269 (मृत्यू 8)

नाशिक मनपा- 535 (मृत्यू 22)

मालेगाव मनपा – 856 (मृत्यू 65)

अहमदनगर- 158(मृत्यू 8)

अहमदनगर मनपा – 52 (मृत्यू 1)

धुळे – 113 (मृत्यू 13)

धुळे मनपा – 177 (मृत्यू 12)

जळगाव- 868 (मृत्यू 100)

जळगाव मनपा- 281 (मृत्यू 15)

नंदुरबार – 40 (मृत्यू 4)

पुणे- 675 (मृत्यू 17)

पुणे मनपा- 8708 (मृत्यू 395)

पिंपरी-चिंचवड मनपा- 690 (मृत्यू 17)

सातारा- 658 (मृत्यू 27)

सोलापूर- 99 (मृत्यू 7)

सोलापूर मनपा- 1369 (मृत्यू 105)

कोल्हापूर- 643 (मृत्यू 8)

कोल्हापूर मनपा- 27

सांगली- 167 (मृत्यू 3)

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 13 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 130

रत्नागिरी- 378 (मृत्यू 14)

औरंगाबाद – 58 (मृत्यू 2)

औरंगाबाद मनपा – 2027 (मृत्यू 108)

जालना- 209 (मृत्यू 5)

हिंगोली- 214

परभणी- 53 (मृत्यू 3)

परभणी मनपा-25

लातूर -108 (मृत्यू 4)

लातूर मनपा- 31

उस्मानाबाद-125(मृत्यू 3)

बीड – 63 (मृत्यू 1)

नांदेड – 33 (मृत्यू 1)

नांदेड मनपा – 138 (मृत्यू 67)

अकोला – 53 (मृत्यू 6)

अकोला मनपा- 795 (मृत्यू 32)

अमरावती- 22 (मृत्यू 2)

अमरावती मनपा- 281(मृत्यू 17)

यवतमाळ- 164 (मृत्यू 2)

बुलढाणा – 97 (मृत्यू 3)

वाशिम – 12 (मृत्यू 2)

नागपूर- 54

नागपूर मनपा – 734 (मृत्यू 12)

वर्धा – 11 (मृत्यू 1)

भंडारा – 42

चंद्रपूर -68

चंद्रपूर मनपा – 15

गोंदिया – 68

गडचिरोली- 45

इतर राज्ये/ देश- 78 (मृत्यू 20)

आज झालेल्या मृत्यूंपैकी 80 पुरुष तर 40 महिला आहेत. त्यातील 62 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 47 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 11 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 120 रुग्णांपैकी 91 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading