fbpx
Monday, September 25, 2023
PUNE

पोलिसांना आणि गरजूंना एक हात मदतीचा- आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्राचा पुढाकार


पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या संरक्षणासाठी उतरलेल्या पोलिसांचा देखील सर्व घटकांइतकाच महत्वाचा वाटा आहे. त्यात असह्य उन्हाळा सुरु झाल्याने त्यांना काम करताना थकवा येतो. त्यामुळे हा थकवा कमी व्हावा, या हेतुने आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे पोलिसांना गुल्कॉन-डी (उर्जा देणारे पेय), पाणी बॉटल व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. 
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रासह पुणे शहर भाजप शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ तर्फे पोलिसांना या वस्तू देण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व परिसर व फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता परिसरात झालेल्या उपक्रमात केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, प्रकाश पवार ,रवींद्र्र पासलकर हे सहभागी झाले होते. 
एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भाजपा शिवाजीनगर मतदारसंघाच्या वतीने काही नागरिकांना व गरजू महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, गहू, साखर, तुरडाळ, तेल, मसाला पावडर, चहा पावडर, बेसन, साबण, हँड सॅनिटायझर चा सामावेश होता. आणखी १०० किटचे वाटप गरजवंताना करण्यात येणार आहे. 
डॉ.अजय दुधाणे म्हणाले, कोरोना महामारीत कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचा-याला सुरक्षा मिळणे महत्वाचे आहे. रात्रं-दिवस न थकता आपल्यासाठी पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहुन बारा-बारा तास कार्यरत आहेत.  त्यांच्या कार्याला आमचा सलाम असून सर्वोतोपरी मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: