fbpx
Saturday, December 2, 2023
PUNE

एकसष्ठीचा खर्च टाळून झोपडपट्टीतील नागरिकांकरीता १५०० बाटल्या सॅनिटायझरची भेट

पुणे : कोरोनामुळे उद्भविलेल्या संकटाच्या काळात पोलीस बांधव नेटाने आपले कर्तव्य पार पाडत आहेत. शहराच्या मध्य भागात रेड झोन असून झोपडपट्टयांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परिमंडळ १ अंतर्गत येणा-या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक व पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी श्रीमती अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठानतर्फे मोठया प्रमाणात सॅनिटायझर देण्यात आले. रेखा सुभाष मोहिते यांच्या एकसष्ठीनिमित्त एकसष्ठीचा खर्च टाळून हे सॅनिटायझर देण्यात आले आहेत. 
खडक पोलीस स्टेशनमध्ये हे सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. सुभाष मोहिते, शिरीष मोहिते, विक्रांत मोहिते आदी उपस्थित होते. सॅनिटायझरच्या १०० मिलिलीटरच्या १५०० बाटल्या आणि ५ लीटरचे ६ नग देण्यात आले. पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील बोबडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उज्वला लोखंडे, पोलीस हवालदार बापू शिंदे, एम.जी.गायकवाड, पोलीस नाईक सोमनाथ ढगे, अनिकेत बाबर, सचिन माळी आदींनी हे साहित्य स्विकारले. यापूर्वी देखील प्रतिष्ठानच्या वतीने पीपीई किटस देण्यात आले होते.
विक्रांत मोहिते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरज लक्षात घेता प्रतिष्ठान कार्यरत आहे. रेखा सुभाष मोहिते यांच्या एकसष्ठीचा खर्च टाळून आम्ही मध्य पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील पोलीस व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही मदत दिली आहे. पोलीस, डॉक्टर्स हे कोरोना लढाईत प्रत्यक्षपणे सहभागी असल्याने त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साहित्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: