कोरोना – आज बरे झालेले रुग्ण १०,३३३; नवीन रुग्ण ७७१७, मृत्यू २८१
पुण्यात दिवसभरात १२१३ पॉझिटिव्ह, तर ४४ बळी
मुंबई, दि.२८ : राज्यात आज १० हजार ३३३ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंतची ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.३४ टक्के एवढे झाले आहे. आज देखील नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार २७७ झाली आहे. तर आज ७७१७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ७७१७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २८१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०० (५५), ठाणे- १४७ (३), ठाणे मनपा-१९१ (६),नवी मुंबई मनपा-३३५ (१२), कल्याण डोंबिवली मनपा-२१९ (१६),उल्हासनगर मनपा-४३ (२), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (१), मीरा भाईंदर मनपा-९६ (५), पालघर-८७, वसई-विरार मनपा-१०१ (२), रायगड-१६१ (१८), पनवेल मनपा-१०५ (१), नाशिक-१२२ (१), नाशिक मनपा-२५३ (१०), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१७७ (२), अहमदनगर मनपा-४१ (१), धुळे-११४ (१), धुळे मनपा-१०६, जळगाव-३१२ (१२), जळगाव मनपा-५७ (१), नंदूरबार-४६ (१), पुणे- ३४० (१२), पुणे मनपा-११८२ (२३), पिंपरी चिंचवड मनपा-६७३ (१२), सोलापूर-१६१ (२१), सोलापूर मनपा-६२ (४), सातारा-१३३ (८), कोल्हापूर-१०२ (३), कोल्हापूर मनपा-२७ (३), सांगली-२७ (४), सांगली मिरज कुपवाड मनपा-१०२ (१), सिंधुदूर्ग-१ (१), रत्नागिरी-६३, औरंगाबाद-७८ (२), औरंगाबाद मनपा-५७६ (४), जालना-५५ (१), हिंगोली-५, परभणी-१८, परभणी मनपा-१० (१), लातूर-४४ (४), लातूर मनपा-५३ (१), उस्मानाबाद-१५ (४), बीड-३७, नांदेड-३, नांदेड मनपा-३, अकोला-४५, अकोला मनपा-२३ (१), अमरावती-३२, अमरावती मनपा-२६ (२), यवतमाळ-१८ (१), बुलढाणा-७५ (१), वाशिम-६, नागपूर-७९ (७), नागपूर मनपा-१२३ (११), वर्धा-२०, भंडारा-१, गोंदिया-३, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-७, गडचिरोली-६, इतर राज्य ७.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १९ लाख ६८ हजार ५५९ नमुन्यांपैकी ३ लाख ९१ हजार ४४० नमुने पॉझिटिव्ह (१९.८८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८५ हजार ५४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ७३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.
- पुणे अपडेट
- दिवसभरात १२१३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात ५९१ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात ४४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील.
- ७४२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ९८ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ५०४३०.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९१३५.
- एकूण मृत्यू -१२१५
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ३००८०. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५६७
