Sunday, June 21, 2026
PUNE

पुणे शहारतील बिकट प्रसंगी ‘आरोग्य प्रमुख’ रजेवर कसे..? – कॉँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा सवाल

आरोग्य प्रमुखांना तातडीने रुजू होण्याचे आदेश द्यावेत यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना गोपाळदादा तिवारी यांचे पत्र

पुणे, दि. 24 –  शहरात “कोरोना–संसर्ग वाढत  असल्यामुळे  १० दिवसांकरिता लॉग डाऊन” लावण्यात आला, तरीही ‘रुग्णसंख्या वाढत आहे’, हे स्थिती गंभीर असून, पुणे मनपा सहा.आरोग्य प्रमुख अधिकारी पैकी दोघे पॉझिटिव्ह  झाल्याचे व ‘आरोग्य प्रमुख’ देखील रजेवर(?) गेल्याचे समजले, हि बेजाबदार पणाची व काळजीची बाब आहे. पुणे शहारतील बिकट प्रसंगी ‘आरोग्य प्रमुख’ रजेवर कसे..? असा सवाल कॉँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात गोपाळदादा तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून आरोग्य प्रमुखांना तातडीने रुजू होण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

पत्रात गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे की, वास्तविक पुणे शहरात “युद्ध पातळीवर कोरोना-प्रतिबंधात्मक नियोजन” गरजेचे आहे. यासाठी आम्ही देखील सहकार्याच्या भूमिकेतूनच ‘राजीव गांधी समिती’तर्फे “झूम-चर्चासत्र” नुकतेच घेतले होते. त्यास डॉ नीलमजी गोऱ्हे, पुणेकॉंग्रेस अध्यक्ष मा रमेशजी बागवे, सनदी अधिकारी मा महेशजी झगडे, निवृत्त आरोग्य प्रमुख, IMCA महाराष्ट्र अध्यक्ष डॉ भोंडवे, खाजगी हॉस्पिटलचे प्रमुख, राजकीय, सामाजिक व व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. ‘पुणे मनपा’स “असंख्य पुणेकर, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, विवध सामाजिक संस्था इ.” सर्वतोपरी सहकार्याच्या भूमिकेत असून देखील आरोग्य प्रमुखच रजेवर गेल्याने, यंत्रणेत त्रुटी जाणवत आहेत. मा आरोग्यप्रमुख डॉ रामचंद्र हंकारेना कोरोना’ प्रादुर्भाव झाला नसतांना, व “वर्क फ्रॉम होम’ची सुविधा असतांना” अशा ‘बिकट प्रसंगी’ आरोग्य प्रमुखांची रजा मान्य करणे, मनाला पटणारे नाही. मा महोदयांनी आरोग्य प्रमुखांना तातडीने रुजू होण्याचे आदेश द्यावेत हि विनंती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading