ऐश्वर्या राय बच्चनसह आराध्या नानावटी रुग्णालयात भरती

बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांना ही कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्याला लक्षणे नसल्याने होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आणि घशात त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना संध्याकाळी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.
