Wednesday, October 14, 2026
BusinessLatest News

RMK समूहामार्फत मावळमध्ये यावर्षी ₹२,५०० कोटींची गुंतवणूक व ४,००० थेट रोजगार

पुणे  : RMK समूहामार्फत मावळ तालुक्यात चालू वर्षात ₹२,५०० कोटींची गुंतवणूक झाली असून ४,००० थेट रोजगार उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती RMK समूहाचे चेअरमन श्री. रामदास काकडे यांनी दिली. या गुंतवणुकीत प्रामुख्याने एनर्जी इन मोशन (EIM), व्हिस्टिऑन (Visteon), एनडीएस (NDS), पीटीएल (PTL), अमेय फिनिशिंग सोल्यूशन्स, रिव्होल्टेक, के-नेस्ट, डब्ल्यू अँड डी (W&D), बोरटेक (Boretech) आणि मान अँड हमेल (Mann+Hummel) या कंपन्यांचा समावेश आहे.

उद्घाटन सोहळा:

पर्यावरणपूरक, बॅटरीवर चालणारे (ईव्ही) ट्रक बनवणाऱ्या एनर्जी इन मोशन (EIM) या कंपनीच्या RMK इंडस्ट्रियल पार्क ३, आंबी (ता. मावळ, जि. पुणे) येथील प्रकल्पाचे उद्घाटन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता होणार आहे. EIM ही कंपनी अवजड मालवाहतुकीसाठी बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञानावर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक तयार करते. कंपनीचा ५५ टन क्षमतेचा ‘अश्वा’ (Ashwa) इलेक्ट्रिक ट्रक सुमारे सात मिनिटांत संपलेली बॅटरी बदलून पुन्हा प्रवासासाठी सज्ज होतो, त्यामुळे वाहतुकीतील वेळ वाचतो आणि डिझेलचा वापर व प्रदूषण कमी होते. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाला (JNPA) कंपनी ई-ट्रकचा पुरवठा करत असून, मुंबई–पुणे मार्गावरही हे ट्रक लवकरच धावणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री मा. श्री. एच. डी. कुमारस्वामी यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार आणि ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. शरद पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती असेल. RMK स्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रणजित रामदास काकडे हे या सोहळ्याचे निमंत्रक आहेत.

RMK समूहामार्फत सात वर्षांत ₹१०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक

मागील सात वर्षांत RMK समूहामार्फत मावळ तालुक्यात ₹१०,००० कोटींहून अधिक गुंतवणूक आणि १०,००० हून अधिक थेट रोजगार निर्माण झाले आहेत. याच काळात समूहाने १५,००० हून अधिक वृक्षांचे रोपण केले असून या उद्योगांसाठी ११.२ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. तळेगाव एमआयडीसीतील एकूण रोजगारांपैकी सुमारे ३० ते ४० टक्के रोजगार RMK समूहामुळे निर्माण झाले आहेत.

परराज्यात जाणारे उद्योग मावळमध्ये : परराज्यात जाणारे उद्योग मावळमध्ये आणण्यासाठी RMK समूह ओळखला जातो. मावळमध्ये येणाऱ्या उद्योगांना सर्व आवश्यक सुविधा जलद गतीने उपलब्ध करून देणे, हे समूहाचे वैशिष्ट्य आहे. २०२४ मध्ये RMK इंडस्ट्रियल पार्कमध्ये ह्युंदाईच्या वेंडर कंपन्यांसाठी केलेली उभारणी हा या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरला. RMK मार्फत इटली, फ्रान्स, जपान, अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवान आदी देशांतील कंपन्यांनी मावळमध्ये गुंतवणूक केली असून, त्यामुळे मावळ तालुका आंतरराष्ट्रीय उद्योगजगताच्या नजरेत ठळकपणे आला आहे.

कुशल मनुष्यबळ उपलब्ध : कंपन्यांना कुशल मनुष्यबळ मिळावेत म्हणून “यशोदा महादेव काकडे इंजीनियरिंग कॉलेज” ची निर्मिती

उद्योगांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग: 
शेतकऱ्यांना भागीदार केले असून प्रति एकर 1,75,000 प्रति महा उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading