पुणेकर खेळाडूंनी सादर केले किक बॉक्सिंगचे प्रात्यक्षिक
जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जागतिक ऑलिंपिकमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
त्यामध्ये किक बॉक्सिंग हा खेळ. महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या रिविजन मान्यतेवरची आधारित गेल्या तीन वर्षांपासून आहे या खेळाचे विशेष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
त्यामध्ये किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष मा श्री. निलेश शेलार सर तसेच किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पुणे शहर चे अध्यक्ष श्री. रुपेश परदेशी सर यांनी बॉक्सिंग खेळाची प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी आर्या स्पोर्ट्स क्लब पुणे च्या. दोन खेळाडूंची नावे सुचवली होती आराध्या मोहन गावडे व अन्वी अमित बैले या दोन खेळाडूंनी किक बॉक्सिंग खेळातील किक लाईट मधील आपले फाईट चे कौशल्य दाखवले.
या कार्यक्रमांमध्ये ऑलम्पिक मधील सर्व खेळातील क्रीडा प्रेमींनी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची सभा वाढवली.
