Friday, June 5, 2026
Latest NewsSports

ट्रिनिटी संघाला विजेतेपद !!

पुणे :  इकोल स्पोर्ट्‌‍स फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‌‘इकोल करंडक‌’ १६ वर्षाखालील मुलांच्या कसोटी (दोन दिवसीय-९० षटके) आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तन्मय कुलकर्णी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने ट्रिनिटी संघाने जेट्स ७ स्पोर्ट्‌‍स क्लबचा ६ गडी राखून निर्णायक विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आंबवडे (भोर फाटा) येथील इकोल क्रिकेट मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यात पहिल्यांदा खेळणाऱ्या जेट्स ७ स्पोर्ट्‌‍स संघाचा डाव २६ षटकात ७६ धावांवर गडगडला. तन्मय कुलकर्णी याने ११ धावात चार गडी बाद केले आणि अर्जुने साले याने १२ धावांत चार गडी बाद करून जेट्स संघाच्या डावाला खिंडार पाडले. अथर्व अंधारे याने सर्वाधिक १९ धावा केल्या. जेट्स संघाला झटपट गुंडाळल्याचा फायदा घेत मोठी धावसंख्या उभी करण्याचा लाभ ट्रिनिटी संघाला घेता आला नाही. ट्रिनिटी संघाने पहिला डावात ३१.१ षटकात ९१ धावा केल्या परंतु संघाने १५ धावांची आघाडी घेतली. राजवीर तावरे (१७ धावा) आणि अभय कोटकर (१४ धावा) व तन्मय कुलकर्णी (१४ धावा) यांनी छोट्या खेळी केल्या. राजवीर बोथरा याने ट्रिनिटी संघाचा निम्मा संघ ३० धावांत तंबुत पाठूवन चमकदार गोलंदाजी केली.

दुसऱ्या डावातही जेट्स ७ स्पोर्ट्‌‍स संघ फारशी चमक दाखवू शकला नाही आणि त्यांचा दुसरा डाव ३५ षटकात ८७ धावांवर संपुष्टात आला. पार्थ सायमोते याने सर्वाधिक २५ धावा जोडल्या. तन्मय कुलकर्णी याने याही डावात ३३ धावांवर पाच गडी बाद केले. दुसऱ्या बाजुने शिवांश पटनाईक याने तीन आणि तनिष्क नालगे याने दोन गडी बाद केले. विजयासाठी ७२ धावांचे लक्ष्य ट्रिनिटी संघाने १९.३ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. कुलवंश वाकोडे (२१ धावा), तन्मय कुलकर्णी (नाबाद १५ धावा) आणि राजवीर तावरे (नाबाद १३ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे माजी रणजीपटू आणि महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला संघाचे प्रशिक्षक हेमंत आनंद किणीकर, इकोल फाऊंडेशनचे संचालक शुभेंद्र भांडारकर, अंशुल शर्मा, दर्शन जिंदल आणि प्रत्युषा भारतीया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जितेंद्र शेंडगे, मनोज पवळे, स्पर्धेचे संचालक शशांक जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या ट्रिनिटी आणि उपविजेत्या जेट्स ७ स्पोर्ट्‌‍स संघाला करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आली.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः

जेट्स ७ स्पोर्ट्‌‍सः पहिला डावः २६ षटकात १० गडी बाद ७६ धावा (अथर्व अंधारे १९, श्रीदीप अडगळे ११, राजवीर बोथरा ११, तन्मय कुलकर्णी ४-११, अर्जुन साले ४-१२);
ट्रिनिटीः पहिला डावः ३१.१ षटकात १० गडी बाद ९१ धावा (राजवीर तावरे १७, अभय कोटकर १४, तन्मय कुलकर्णी १४, राजवीर बोथरा ५-३०, पार्थ एस. २-२०);
जेट्स ७ स्पोर्ट्‌‍सः दुसरा डावः ३५ षटकात १० गडी बाद ८७ धावा (पार्थ सायमोते २५, राजवीर बोथरा ११, तन्मय कुलकर्णी ५-३३, शिवांश पटनाईक ३-१५, तनिष्क नालगे २-१४);
ट्रिनिटीः दुसरा डावः १९.३ षटकात ४ गडी बाद ७३ धावा (कुलवंश वाकोडे २१, तन्मय कुलकर्णी नाबाद १५, राजवीर तावरे नाबाद १३, पार्थ एस. २-२४);
निकालः ट्रिनिटी संघाचा ६ गडी राखून विजय;
सामनावीरः तन्मय कुलकर्णी (९ विकेट);

वैयक्तिक पारितोषिकेः
स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूः आर्य कुमावत (३८३ धावा, १३ विकेट, ट्रिनिटी);
सर्वोत्कृष्ट फलंदाजः शौर्य कोंडे (३६७ धावा, रिक्रीएशन क्लब);
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः तन्मय कुलकर्णी (२१ विकेट, ट्रिनिटी);
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकः कुलवंश वाकोडे (९ बाद, ट्रिनिटी);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading