Friday, May 29, 2026
BusinessLatest NewsTECHNOLOGY

रियलमी १६ फाईव्ह जी पुण्यात सादर

 

पुणे :- भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत तरुण ग्राहकवर्गाला लक्ष्य करत रियलमीने ‘रियलमी १६ फाइव्ह जी’ हा नवीन स्मार्टफोन पुण्यात सादर केला. हा स्मार्टफोन पुण्यातील जंगली महाराज रोडवरील एसएस कम्युनिकेशन स्टोरमध्ये सादर करण्यात आला. सडपातळ ‘एअर डिझाइन’, उच्च क्षमतेची बॅटरी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित कॅमेरा प्रणाली या वैशिष्ट्यांमुळे हा स्मार्टफोन मध्यम किंमतीच्या श्रेणीत आपला वेगळेपणा दर्शवतो.

या स्मार्टफोनमध्ये दुहेरी पन्नास मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा प्रणाली देण्यात आली असून त्यात समोरील तसेच मागील कॅमेऱ्यांचा समावेश आहे. नैसर्गिक त्वचा रंगसंगती, अचूक तपशील तसेच विविध प्रकाश परिस्थितींमध्ये संतुलित प्रतिमा देण्याची क्षमता यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक सक्षम होतो. जोडीलाच, ‘रिअर सेल्फी मिरर’ ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना वापरकर्त्यांना मुख्य कॅमेऱ्याद्वारे सेल्फी टिपताना प्रतिमा थेट पाहण्याची सुविधा देते. तसेच, ‘जेश्चर ओळख’ व ‘व्हॉइस काउंटडाऊन’ यांसारख्या सुविधांमुळे वापर अधिक सुलभ होतो

या स्मार्टफोनच्या ८ जीबी प्लस १२८ जीबी मॉडेलची किंमत ही ३१,९९९/- आहे. तर ८ जीबी प्लस २५६ जीबी मॉडेलची किंमत ही रुपये ३३,९९९/- इतकी आहे. तसेच १२ जीबी प्लस २५६ जीबीची किंमत ही रुपये ३६,९९९/- आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading