Friday, March 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

कॅप्टन अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया यांनी केली रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी

भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी चाकणकर आणि भोंदू कॅप्टन यांची चार नवी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत.

अंक ज्योतिष आणि अध्यात्मिक शक्तीच्या नावाखाली अनेक उच्चपदस्थांना नदी लावणाऱ्या व महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली गजाआड असलेल्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या ट्रस्टवर चाकणकर या विश्वस्त आहेत. त्यांनी खरात याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे छायाचित्र व त्याची पाद्यपूजा केल्याचे चित्रण प्रसिद्ध झाले आहे. दमानिया यांनी आणखी नवी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत.

अशा Epstein बाबांवर इतकी मेहेरबानी ? ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ? ह्या रुपाली चाकणकरांची तत्काळ पदावरून हकालपट्टी करा, असेही दमानिया यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading