Saturday, February 28, 2026
BusinessLatest News

महिंद्राकडून महाराष्ट्रात दमदार नवीन लूक आणि सुधारित मास्‍ट डिझाइन असलेली नवीन रोटाव्‍हेटर सिरीज लाँच  

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा, भारतातील पहिल्‍या क्रमांकाची ट्रॅक्टर कंपनी आणि देशातील सर्वात मोठी कृषी यंत्रसामग्री व रोटाव्‍हेटर उत्‍पादक कंपनीने महाराष्ट्रात आपल्या नव्या महिंद्रा रोटाव्‍हेटर सिरीजच्या लाँचची घोषणा केली आहे. दमदार नवीन लूक आणि अधिक रुंद मास्‍ट डिझाइन असलेली ही नवी महिंद्रा रोटाव्‍हेटर सिरीज जड कामासाठी सक्षम कामगिरी आणि मजबूत एकूण बांधणी सुनिश्चित करते. ही नवीन सिरीज हेवी ड्युटी रोटाव्‍हेटर श्रेणीत – महाव्‍हेटर आणि महाव्‍हेटर एचडी – ४ ते ९ फूट या आकारांमध्ये उपलब्ध असेल.

बाजारपेठेतील सविस्‍तर विश्लेषण आणि शेतकऱ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे विकसित केलेली महिंद्राची नवी रोटाव्‍हेटर श्रेणी अधिक मजबूत रचना आणि वाढीव टिकाऊपणा प्रदान करते. ही नवीन श्रेणी जड नांगरणीची कामे आणि सतत होणाऱ्या झीजेला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी अधिक कार्यक्षम आहे. सुधारित स्थिरता आणि हाताळणीसह भारतात सामान्यपणे आढळणाऱ्या कठीण आणि असमतल शेतजमिनीवर देखील रोटाव्‍हेटर दीर्घकालीन विश्वासार्हतेची खात्री देते.

नवीन लूक असलेल्या रोटाव्‍हेटर सिरीजबाबत मत व्‍यक्‍त करत महिंद्रा फार्म इक्विपमेंट बिझनेसच्या इंटरनॅशनल ऑपरेशन्सच्या व्हाइस प्रेसिडेंट आणि फार्म मशिनरीच्या बिझनेस हेड डॉ. अनुशा कोठंदरामन म्हणाल्या, “कृषी यांत्रिकीकरण हे शेती उत्पादकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शेतजमिनीची मशागत करण्यामध्ये रोटाव्‍हेटरची भूमिका महत्त्वपूर्ण असते. महिंद्रामध्ये आम्ही नव्याने डिझाइन केलेले रोटाव्‍हेटर अधिक उत्कृष्ट कामगिरी देण्यासाठी विकसित केले आहेत. तसेच ट्रॅक्टरच्या पलीकडे जाऊन, शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार देणाऱ्या कृषी उपकरणांबाबत त्यांचा मालकीभाव अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरुवातीला ४ ते ९ फूट या श्रेणीत उपलब्ध होणारे हे नवीन लूक रोटाव्‍हेटर महाराष्ट्रातील महिंद्राच्या विस्तृत डीलर नेटवर्कद्वारे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील.”

नवीन डिझाइन करण्‍यात आलेली रोटाव्‍हेटर श्रेणी महिंद्राच्या सध्याच्या रोटाव्‍हेटर मॉडेल्सची जागा घेणार असली, तरीही महिंद्रा आपली विद्यमान मॉडेल श्रेणी उपलब्ध ठेवणार आहे. त्यामुळे विविध शेती पद्धती आणि कामकाजाच्या गरजा लक्षात घेऊन ग्राहकांना संपूर्ण पर्याय उपलब्ध राहतील.

आपल्या राष्ट्रभावनेचा सन्मान करण्यासाठी महिंद्राने तिरंग्यापासून प्रेरित मेटलिक ऑरेंज, एव्हरेस्ट व्हाईट आणि मेटलिक ग्रीन या रंगांमध्‍ये मर्यादित आवृत्तीतील महिंद्रा रोटाव्‍हेटर देखील सादर केले आहे. महाव्‍हेटर एचडी, सुपरव्‍हेटर आणि गायराव्‍हेटर झेडएलएक्‍स+ या प्रकारांमध्ये उपलब्ध असलेली ही विशेष आवृत्ती भारताच्या शेतकरी समुदायाच्या सामर्थ्य आणि जिद्दीला मानवंदना आहे.

महिंद्रा ‘इंटेलिजंट रोटाव्‍हेटर’ देखील उपलब्ध करून देते. हे ‘तेज-ई’ या ब्रँड नावाखालील एक पेटंट मिळवलेले नवीन संशोधन आहे. रोटाव्‍हेटरमध्ये समाविष्ट केलेल्या ब्लूटूथ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे इंटेलिजंट रोटाव्‍हेटर शेतातून रिअल-टाइम माहिती थेट मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर पाठवते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक मशागत पद्धती यांचे संयोजन घडवून आणते, ज्यामुळे अचूक शेतीची व्याख्याच बदलली आहे.

महिंद्रा देशातील सर्वात मोठ्या रोटाव्‍हेटर उत्पादकांपैकी एक आहे. कंपनीची विस्तृत रोटाव्‍हेटर श्रेणी जागतिक दर्जाच्या मानकांनुसार डिझाइन आणि चाचणी केलेली आहे. भारत आणि जगभरातील विविध शेती परिस्थितींमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी कंपनी शेतकऱ्यांसोबत मिळून काम करते. ‘मेड इन इंडिया’ असलेले महिंद्रा रोटाव्‍हेटर पंजाबमधील नाभा आणि तेलंगणातील झहीराबाद येथील समर्पित उत्पादन प्रकल्पांमध्ये तयार केले जातात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading