महात्मा फुले वाडा भाड्याने देण्यास संभाजी ब्रिगेड’चा विरोध…
पुणे : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले वाडा ही समता भुमी आहे. महात्मा फुलेंचे विचार सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत. ते कुठल्या एका संघटनेची किंवा विचारांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही. फुले वाडा संगोपनासाठी किंवा भाडेतत्त्वावर कोणालाही देऊ नये. छगन भुजबळ यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांनाच महात्मा फुलेवाडा चालवायला किंवा संगोपणासाठी देणे योग्य नाही. विचारांना बदनाम करू नका.
महात्मा फुले वाड्याचा महाराष्ट्र सदन करू नका. ज्या विचारांची सावली महात्मा फुले यांच्या अंगावर नको होती अशाच वाईट प्रवृत्तीच्या लोकांची सावली फुले वाड्यावर नको. आम्ही फुले वाड्याची तशी बदनामी खपवून घेणार नाही.
ज्या छगन भुजबळ यांनी रिडल्स मोर्चा झाल्यानंतर मुंबईत हुतात्मा चौक स्वच्छ केला होता. कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य वाईट वाटलेलं होतं. कारण बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकात भुजबळांना वाटत होते की हिंदू धर्माची बदनामी झालेली आहे. अशा भुजबळांकडं महात्मा फुले वाडा हा समता परिषदेच्या माध्यमातून चालवायला देणे आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, संभाजी ब्रिगेडचा तीव्र विरोध आहे. यासाठी सरकारने चुकीचा निर्णय घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करून.
महात्मा फुले वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आह, तो तसाच राहू द्यावा. कुठल्याही एका पक्षाच्या किंवा संघटनेच्या ताब्यात देऊ नये. पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका हे महात्मा फुले वाड्याचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारने कोणाच्याही दबावाला बळी न पडता चुकीचा निर्णय घेऊ नये… अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.
महात्मा फुले वाड्याचं महाराष्ट्र सदन करू नका…! या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, महादेव मातेरे, प्रीतम कोंढाळकर व जवाब दो आंदोलनाचे दत्तात्रय जाधव, संदेश दिवेकर उपस्थित होते.
