Sunday, June 7, 2026
BusinessLatest News

डीएसपी म्युच्युअल फंडाचा पॅसिव्ह फंडाबाबत सक्रिय दृष्टीकोन

भारतातील पॅसिव्ह गुंतवणुकीचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डीएसपी म्युच्युअल फंडाने पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. इंडेक्स फंड (विशिष्ट बाजार निर्देशांकाचा मागोवा घेणारे फंड) आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ – ज्यांचे समभागांसारखे व्यवहार केले जातात) यांसारखी अप्रत्यक्ष गुंतवणूक साधने शेअर बाजारामध्ये प्रवेश करण्याचा एक सोपा आणि कमी खर्चिक मार्ग गुंतवणूकदारांना प्रदान करतात. ही साधने गुंतवणूकीतील मानवी पूर्वग्रह दूर करतात. तसेच पारदर्शक नियमांचे पालन करत सर्वसामान्य  (रिटेल) गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांशी मिळताजुळता उत्तम पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करतात.
जागतिक पातळीवर पॅसिव्ह गुंतवणूक प्रकाराने प्रचंड वाढ अनुभवली आहे. अमेरिकेसारख्या देशात एकूण मालमत्तेपैकी 50 टक्के मालमत्ता ही पॅसिव्ह फंडात गुंतलेली आहे. भारतातसुध्दा पॅसिव्ह एयूएम (व्यवस्थापनांतर्गत असलेली एकूण गुंतवणूक मालमत्ता) म्हणजेच फंड किंवा गुंतवणूक कंपनीकडून व्यवस्थापित केल्या जात असलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य यात गेल्या तीन वर्षात तब्बल 182 टक्के वाढ होऊन ते 9.5 लाख कोटी रुपयांवर झेपावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खूपच सरस ठरलेली समान भार निर्देशांक (असा निर्देशांक ज्यात बाजार भांडवली मूल्याआधारे भार निश्चितीऐवजी प्रत्येक समभागाला समान भार दिलेला असतो) यासारखी धोरणपध्दत आता भारतातही लोकप्रिय होत चालली आहे. आधी संशोधन आणि या धोरणपध्दतींची प्रत्यक्ष चाचणी घेतल्यानंतर डीएसपी म्युच्यूअल फंड हा भारतात 2017 मध्ये समान भार निर्देशांक फंड अर्थात इक्वल वेटेज इंडेक्स फंड आणि 2021 मध्ये ईटीएफ फंड सुरु करणारा पहिला फंड ठरला आहे. आमचा इक्वल वेटेज इंडेक्स फंड हा तब्बल दहा पटीने वाढला आहे.
समभाग गुंतवणूक क्षेत्रात राबविण्यात आलेल्या नाविन्यपुण धोरणांप्रमाणेच नियमित उत्पन्न पातळीवरसुध्दा डीएसपी म्युच्यूअल फंड हा प्रथम पुढाकार घेणारा फंड ठरला आहे. 2018 मध्ये लिक्विड ईटीएफ फंड योजना सुरु करणारा डीएसपी म्युच्यूअल फंड हा दुसरे फंड घराणे ठरले आहे. भांडवली बाजारांमध्ये समभागांचे व्यवहार करताना शिल्लक निधी असलेल्या गुंतवणूकदारांना या फंडाद्वारे हा गुंतवणूक पर्याय देण्यात आलेला आहे. सध्याच्या काळात दोन लिक्वीड इटीएफ योजना असलेले डीएसपी हे एकमेव फंड घराणे आहे. यातील एक योजना ही नियमित पेआईऊट योजना असून त्यात तुमच्या उत्पन्नावर लांभाश प्राप्तीकर आकारला जातो (या योजनेचे नाव लिक्वीडइटीएफ) आणि दुसरी योजना वाढीवर आधारित एनएव्ही योजना असून त्यात तुमच्या उत्पन्नावर भांडवली कर आकारला जातो (या योजनेचे नाव लिक्वीडअॅड).
येत्या 2030 पर्यंत भारतीय म्युच्यूअल फंड उद्योग आपला आकार दुप्पट करुन 100  लाख कोटी रुपयांवर झेपावण्याचे उद्दीष्ट बाळगून आहे समभाग (शेअर), डेट (रोखे) आणि वस्तू (कच्चा माल अथवा प्राथमिक उत्पादने) आदी प्रकारांत अप्रत्यक्ष (पॅसिव्ह) गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची आशा असून विशेषतः नवीन गुंतवणूकदारांमध्ये अशा गुंतवणूकीचे प्रमाण अधिक भिनताना दिसणार आहे.
पॅसिव्ह फंडांचे उद्दिष्ट बाजारातील उत्पन्नाशी जुळणारे असले तरी, गुंतवणूकीत “स्मार्ट बीटा” धोरणे देखील आहेत. जोखीम कमी करण्याचा किंवा परतावा वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि समभागांच्या विशिष्ट गटांच्या अनुरूप निधी गुंतवण्यासाठी ही बीटा धोरणे विशिष्ट नियमांचे पालन करतात. ती पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यास आणि गुणवत्ता किंवा कमी अस्थिरता यासारख्या विशिष्ट वैशिष्ट्यांसह समभागांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करू शकतात. तथापि, बाजारात तीव्र बदल होत असताना स्मार्ट बीटा फंड कधीकधी अल्प कामगिरी करू शकतात. या स्मार्ट बीटा श्रेणीमध्ये, डीएसपी म्युच्युअल फंडाने गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केलेले आहे आणि विशिष्ट समभाग वगळण्यासाठी दर्जेदार चाळणी पध्दतींचा अवलंब करून मिड कॅप तसेच स्मॉल कॅप विभागात इंडेक्स फंड लॉन्च केले आहेत. यात  विस्तृत अशा समभागांच्या विश्वातून केवळ 50 चांगल्या दर्जाच्या कंपन्या निवडत एक निर्देशांकही साकारला आहे.
गुंतवणुकीच्या प्रवासासाठी एक चांगला आरंभ बिंदू म्हणून काम करू शकणाऱ्या साध्या पॅसि्व्ह उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी गुंतवणूकदारांचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading