सह्याद्री समाजच्या वतीने तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
पुणे : सह्याद्री समाजसर्वजन हितार्थ सर्वजन सुखार्थ वतीने प्रउत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 21 ते 23 जून दरम्यान आळंदी येथे करण्यात आले असून या शिबिरात आदर्श सद्विप्र’ कसे बनले जावू शकते या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आचार्य दिलीप सागर, आचार्य शिवानंद दानी, सुशील रंजन, गणेश भट हे मार्गदर्शन करणार आहेत.
आधुनिक युगातील महान तत्वज्ञ प्रभात रंजन सरकार हे प्रगतिशील उपयोगी तत्व ’प्रउत’ चे प्रणेते आहेत. त्यांनी भारताला 44 समाजामध्ये विभागण्या विषयी सांगितले आहेत. सह्याद्री समाज हा त्या 44 समाजापैकी एक आहे. सह्याद्री समाजाला स्वतःचा गौरवशाली इतिहास आहे. अध्यात्माचा वारसा जपणारे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आणि छत्रपती शिवजी महाराजांची ही शूर भूमी आहे.
आज समाजातील वाढती आर्थिक विषमता, कमी होत चाललेल्या रोजगारांची संधी, वाढता भौतिकवाद, अध्यात्मापासून दूरावलेली जीवनशैली, उपेक्षित जीवन, असाह्यता, जीवनाबद्दल निराशा, आत्महत्याच्या घटना अशा विविध प्रकाराच्या शेकडो समस्या निर्माण झालेल्या आहेत. परस्पर सौहार्दाचा अभाव, मानवी मुल्यांचा अभाव दिसून येत आहे.श्री. प्रभात रंजन सरकार सांगतात की, या सर्व समस्यांवर एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे सद्विप्र समाज ची निर्मिती होणे गरजेचे आहे. आणि हा सद्विप्र समाज ची निर्मिती ही केवळ आणि केवळ एक आदर्श ’सद्विप्र’ च तयार करू शकतो. ’सद्विप्र’ म्हणजेच विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सार्याचे ’एकरूप’ म्हणजेच ’सद्विप्र’ होय. यांना सतत संर्घष करावा लागतो. त्यांना कधीच विश्रांती मिळू शकत नाही. हेच ’सद्विप्र’ बनविण्याचे हे प्रशिक्षण शिबीर आहे. या मध्ये ’आदर्श सद्विप्र’ कसे बनले जावू शकते या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हे ’सद्विप्र’ दृढनिश्चयाने घोषणा करतील सर्व मानवांची एकच जात आहे. प्रत्येक मानवाला समान हक्क आहे. सर्व मानव बंधू आहेत. समाजशोषकांना ते ’सद्विप्र’ बजावतील की मानवाचे शोषण चालू देणार नाहीत. धर्माच्या नावावर शोषण चालू देणार नाहीत. त्यागाचे प्रतिक अशा भगव्या ध्वजाभोवती जमून हे जागोजागी विखुरलेल्या मानव समाज्याच्या सेवेस स्वतःला वाहून घेतील आणि घोषणा करतील जगातील मानवानो एक व्हा.
या सोबत या शिबीरात एक मानव समाज, शोषण विरहीत मानवसमाज, मानव धर्माचे उत्थान, वसुदैव कुटुंबम संस्थापन, सांस्कृतिक आनंद, आर्थिक विकास, स्वतंत्र आर्थिक धोरण, ब्लॉक स्तरावर नियोजन, आर्थिक नियोजनात स्थानिक लोकांचा सहभाग व अधिकार नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण व वापर, सांस्कृतिक चिन्हाशिवाय आर्थिक गती. या सर्व विषयांवर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी देश भरातून प्रशिक्षक येणार आहेत. आचार्य दिलीप सागर, आचार्य शिवानंद दानी, सुशील रंजन, गणेश भट हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच नव्यमानवतावाद या विषयावर नरेंद्र राजपूरोहित हे मार्गदर्शन करतील. या शिबीरात राज्यातून शेकोडो प्रशिक्षणार्थी येणार आहेत.अशी माहिती सह्याद्री समाज अध्यक्ष शुभेंदू प्रभू यांनी सांगितले. या पत्रकार परिषेदेस सह्याद्री समाज सचिव मंगेश अवथळे, समाज अध्यक्ष शुभेंदू प्रभू, समाज प्रकाशक प्रवक्ता संजय देडे , पुनम वर्मा, वित्त सचिव, आचार्य शिवानंद दाणी,आचार्य दिलीप हे उपस्थित होते. प्रशिक्षण आज 21 जून पासून सुरु झापे असूने 23 जून या कालावधीत होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. प्रशिक्षण गंधर्व मंगल कार्यालयपद्मावती रोड, भोसले नगर, आळंदी, पुणे. 412105 येथे होणार आहे. जर कोणास प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेण्याची इच्छा असेल तर 8329565733, 7208819714, 9096833656 या नंबरवर संपर्क करावा.
