Tuesday, April 7, 2026
Latest NewsPUNE

भारताचं नंदनवन अवतरलय पुण्यात

पुणे : काश्मिरी कलाकुसरीचा पश्मिना, कशिदाकारीची मुलायम शाल, कडक चहाची आठवण देणारे कावा पेय, अक्रोडच्या लाकडापासून तयार केलेल्या नक्षीदार वस्तू अशा कितीतरी प्रकारच्या दालनांनी कोथरूड एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचा परिसर सज्ज झाला आहे. आझादी का अमृत महोत्सवांतर्गत केंद्र सरकार संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित वितस्था (काश्मिर) सांस्कृतिक महोत्सव पुढील दोन दिवस (दि. 2 एप्रिल पर्यन्त ) सुरू रहाणार आहे.
एमआयटी परिसरातील झाडांना केशरी, पिवळया पानांची सजावट
काश्मिरच्या चिनार वृक्षाची आठवण जागविणारी आहे. नदी नसली तरी काश्मीरची ओळख देणारा शिकारा, केशराची रंगीबेरंगी फुलं वातावरण अधिकच खुलवत आहेत.
काश्मीरच्या खाद्यसंस्कृतीची ओळख दर्शविणारे बाकरखानी, चोक वांगुन, कमळाच्या देठांची भजी, राजमा, कुलचा यासह कित्येक पदार्थांची मेजवानी आहे. सुकामेव्यामध्ये अक्रोड, बेदाणे, किवी, चेरी, क्रेनबेरी, दालचिनी, काश्मिरी राजमा, केशर आदींचा समावेश आहे. केशराच्या शेतातील अस्सल मध, लालजर्द केशर तर आहेच.
काश्मिरी हातमाग, ज्यावर पश्मिना, शाली, दुपट्टे, स्टोल्स विणले जातात, त्याचेही प्रात्यक्षिक या तीन दिवसांत दाखविण्यात येणार आहे. ड्रेस मटेरिअल, कापडी टी कोझी, पर्स, पिशव्यांच्या खरेदीला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

हा महोत्सव पुढील दोन दिवस पुणेकरांसाठी खुला रहाणार आहे.

आज महोत्सवात (एमआयटी वर्ल्डपिस युनिव्हर्सिटी, कोथरूड)
‘आकार’ पुणेतर्फे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ सांगीतिक कार्यक्रम
काश्मिरी लोकसंगीत, लोकनृत्य
शारदा कलाक्षेत्र फाउंडेशनतर्फे शारदा स्तोत्रम्.
काश्मिरमधील बालकांचा वाद्यवृंदतर्फे सौरव झाडू आणि प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांचे काश्मिरी आणि डोगरी भाषेतील गायन
-===
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 1 आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी आणि वितस्था यांच्यामधील संबंध, सुरुवातीच्या काश्मीची निर्मिती, काश्मिरी शब्दांचा उगम, काश्मिरी लोकनृत्य, संगीत, नाट्य यांचा शोध घेणारे परिसंवाद आयोजित करण्यात आले असून यात साहित्य अकादमीचे 20 वक्ते बोलणार आहेत.

शनिवार (१ एप्रिल) चर्चासत्र
गोदावरी – वितस्था सांस्कृतिक प्रवास
स्थळ : सावित्रीबाई फुले विद्यापीठ

उद्घाटन समारंभ, चर्चासत्र (प्राचीन काश्मिरची निर्मिती), ( भारत आणि त्याचे काश्मीर). मराठी आणि काश्मिरी गीते, अभिनवगुप्त, गोदावरी नदीची अष्टांगस्थळे आदी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading