Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNE

वडमुखवाडी येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

पिंपरी  – वडमुखवाडी, भोसरी येथील श्री साईबाबा मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे यांच्या हस्ते श्रीराम व साईबाबांची आरती करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लांडगे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी श्रीराम जन्मा निमित्त बबिता नेलगे, अपर्णा नेलगे, अमृता नेलगे आदी महिलांनी पाळणा गायला.

प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार पासूनच श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. काकड आरती, साई चरित्र अखंड पारायण, रुद्राभिषेक, धुपारती तर गुरुवारी साई चरित्र पारायण सांगता त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव सोहळा, माध्यान्य आरती दुपारी श्री सरस्वती महिला मंडळ दिघी यांचा भजनाचा कार्यक्रम सायंकाळी साई मित्र भजन संध्या असे भरगच्च कार्यक्रम झाले. संध्याकाळी मंदिर परिसरातून श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री हरी जागर, भैरवनाथ सांप्रदायिक मंडळ, एकतारी भजनी मंडळ कुरूळी व आभाळवाडी यांचे भजनाचा कार्यक्रम झाले. उद्या शुक्रवारी (३१ मार्च) किर्तन व गोपाळ काला होऊन कार्यक्रमाची सांगता होईल अशी माहिती अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading