श्रीप्रकाश सप्रे यांना ‘पुष्परत्न जीवन गौरव पुरस्कार’ जाहिर
पुणे : सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाटय़ अभिनेते, दिग्दर्शक श्रीप्रकाश सप्रे यांना नाशिकच्या पुष्परत्न साहित्य समूह संस्थेचा ‘पुष्परत्न जीवन गौरव’ पुरस्कार जाहिर झाला आहे. येत्या 5 फेब्रुवारीला वास्को, गोवा येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यादरम्यान, पुणे ते सातार्यादरम्यानच्या प्रवासात बसमध्ये सप्रे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर, नाशिक ते गोवा प्रवासात राष्ट्रीय कवी संमेलन होणार आहे.
